पुण्यात कोरोनाचा धुमाकुळ! दिवसभरात सापडले ८५२ रुग्ण 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । पुणे शहारत रविवारी दिवसभरात ८५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आता पुणे शहरातील एकूण रुग्ण २१ हजार ५२० इतके झाले आहेत. रविवारी एकूण १२ रुग्ण मृत झाले. आतापर्यंत पुण्यात एकूण ७१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरातील १३ हजार १०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशी माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सर्वाधिक ३३६ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  १७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

या आकडेवारीमुळे शहरातील एकूण बाधितांची संख्या ४ हजार २८८ वर पोहचला असून यांपैकी, २,७६५ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामीण भागातील ही आकडेवारी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment