जिल्ह्यात प्रशासनाच्या ‘हम करे सो कायदा’ भूमिकेमुळे कोरोना परिस्थिती हाताबाहेर : आ. शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जिल्हा प्रशासनाच्या फक्त कागदोपत्री घोडे नाचवत असून त्याच्याकडे सर्व अधिकार आहेत.  गावपातळीवर प्रशासन फिरकले नसल्याने त्यांना कोरोनाची दाहकता समजलीच नाही. प्रशासन कोरोना रोखण्यात अपयशी ठरले आहे. याचे खापर लोकप्रतिनिधींवर फोडणे चुकीचे आहे. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना स्वीकारल्या नाहीत, केवळ ‘हम करे सो कायदा’ भूमिकेमुळे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्याची टीका आ. शशिकांत शिंदे यांनी केली.

कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना आ. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर लोकप्रतिनिधींवर टिका होत आहे. आम्ही जम्बो सेंटर उभारताना 500 बेडची आवश्यकता भासेल सांगितले होते.परंतु, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अतिरिक्त परिषदेचे अधिकारी, पोलिसअधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी अथवा जिल्हा शल्य चिकित्सक यासारखे ज्यांच्या हातात जिल्हा आहे. ज्यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत असे अधिकारी कितीवेळा जिल्हा फिरले? कधी स्वत: ऑन फिल्ड उतरले नाहीत.

केवळ कागदोपत्री कामकाज केले. त्यांचेच अनुकरण अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. गावपातळीवर, वाडीवस्तीवर जाऊन त्यांनी कामच केले नाही. कोरोनाविषयक सगळी कामे ही वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व आशा सेविकाच करत होत्या. लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर कार्यवाही केली असती तर कोरोना नियंत्रणात आला असता.

लोकप्रतिनिधींची स्वखर्चातून आणि निधीतून भरीव मदत

गावपातळीवर विलगीकरण कक्ष, कोविड सेंटर्सची उभारणी, मोफत औषधोपचार मोफत रेमडीसीवीर इंजेक्शन्स वाटली. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागणार, ही बाब लक्षात घेऊन विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली. आम्ही आमच्या पध्दतीने काम करतोय. कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये. ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोविड सेंटर्स कार्यान्वित केली. आमदार निधीतून त्यासाठी भरीव तरतूद केली. वेळप्रसंगी स्वखर्चातून आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली असल्याचे आ. शशिकांत शिंदे म्हणाले.

Leave a Comment