कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी आपली एसयूव्ही विकून 250 कुटुंबांसाठी त्याने खरेदी केले ऑक्सिजन सिलेंडर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा सर्वाधिक कहर हा देशातील महाराष्ट्र या राज्यात सुरू आहे. देशभरातील एकूण प्रकरणांपैकी 31 टक्के सक्रिय प्रकरणे ही या राज्यातील आहेत. मुंबई हे कोरोनाचे एपिसेंटर बनले आहे. इथे अशी हालत आहे की आता रुग्णालयात रूग्णांसाठी बेड रिकामी नाहीत. ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटर देखील कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत शहरातील बरेच लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. या संकटाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी मालाडमधील एका व्यक्तीने आपली एसयूव्ही कार विकली आणि या कार विक्रीतून मिळालेल्या पैशातून त्याने 250 कुटुंबांना ऑक्सिजन सिलेंडर दिलेले आहेत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार 2011 मध्ये शाहनवाज शेखनेएक फोर्ड एंडेव्हर कार खरेदी केली होती. या कारमध्ये त्याच्याकडे 007 च्या नंबर प्लेटसह कस्टमाइज म्यूझिक सिस्टमही होती. कोरोना संकटाच्या वेळी त्याने या कारला एका तात्पुरत्या रुग्णवाहिकेत रुपांतरीत केले. कोरोना संक्रमणामुळे 28 मे रोजी त्याच्या बिझनेस पार्टनरच्या बहिणीच्या मृत्यूने सर्व काही बदलले. शाहनवाज शेखच्या पार्टनरची बहीण 6 महिन्यांची गरोदर होती आणि रुग्णालयाबाहेर ऑटोरिक्षामध्ये तिचा मृत्यू झाला. कारण, बेड रिकामे नसल्याने रुग्णालयाने तिला प्रवेश नाकारला होता.

आपल्या बिझनेस पार्टनरच्या बहिणीच्या मृत्यूमुळे शहनवाज शेख खूप अस्वस्थ झाले. त्यांना समजले की जर वेळेत ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली गेली असती तर त्याच्या बहिणीचा जीव वाचू शकला असता. येथूनच त्याला ऑक्सिजन सिलेंडर खरेदी करण्याची कल्पना आली. कोरोनाचे रूग्ण आणि गरजूंसाठी काहीतरी करण्याची त्यांना इच्छा झाली. यासाठी पैशाची गरज होती म्हणून त्याने आपली कार विकली. या पैशातून शाहनवाजने 250 कोरोना रूग्णांच्या कुटुंबियांना ऑक्सिजन सिलेंडर दिले.

शाहनवाज शेख म्हणतात, ‘मला कोरोना रूग्णांसाठी काहीतरी करायचे होते. आणि त्यासाठी एखादी गाडी विकावी लागली तरी काही फरक पडणार नव्हता. मी श्रीमंत कुटुंबातील आहे. मी पुढे जाऊन अशी आणखी चार वाहने घेऊ शकतो. परंतु या साथीच्या वेळी, गरजूंना ऑक्सिजन सिलेंडर देणे फार महत्वाचे होते.

शाहनवाजकडे आणखी एक कार आहे जी सध्या तात्पुरती रुग्णवाहिका म्हणून वापरली जात आहे. मालाड आणि तिथल्या झोपडपट्ट्यांमधील बर्‍याच भागात जिथे कोरोना रूग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही, तेथे शाहनवाजची गाडी तेथून रूग्णांना दवाखान्यात घेऊन जाते. मात्र, यावेळी तो आपल्या सुरक्षिततेचीही विशेष काळजी घेतो. प्रत्येक वेळी जेव्हा ती कर वापरली जाते तेव्हा कार स्वच्छ केली जाते. शाहनवाज स्वतःच आपल्या कुटूंबापासून दूर राहत आहे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे विषाणूचे संक्रमण होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment