नोटांमधूनही पसरतो कोरोना ; संसर्गापासून वाचण्यासाठी आरबीआयने शेअर केले उपाय

Notes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात कोरोना संक्रमणाचा धोका या काही दिवसात पूर्वी इतकाच आहे. त्यात वाढ झालेली नाही. यामुळे मास्क, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर हे नियम सगळीकडे अनिवार्य केले आहेत. पण आता नोटांमधूनही कोरोना पसरत असल्याचे समोर आले आहे.कागदापासून बनवलेल्या नोटांमधून कोरोनाचा प्रसार होतो आहे. त्यामुळे संक्रमण आणखी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. आता पैसे म्हटले की सगळ्यांच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे पैसे घेताना सावधान असणे महत्त्वाचे आहे.

कागदापासून तयार केलेल्या नोटांवर हजारो किटाणू असतात, जे आपल्या हाताला लागतात आणि शरीरात प्रवेश करतात. यातून गंभीर आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोटांवरील संसर्ग टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या मार्गदर्शक सूची दिल्या आहेत. या मार्गदर्शक सूची पैसे घेणे आणि देण्यासंबंधी तयार करण्यात आल्या आहेत. ज्याने कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मदत होईल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नोटांचा वापर टाळा आणि शक्य तितके ऑनलाइन व्यवहार करा. याने तुम्ही कोणाच्याही संपर्कात येत नाही. जर गर्दीच्या ठिकाणी पैशांची देवाण-घेवाण करत असाल तर सगळ्यात आधी तुमचे हात स्वच्छ धुवून घ्या. नोटा दिल्या किंवा घेतल्यानंतर लगेच तोंडाला किंवा मास्कला हात लावू नका. आखिल भारतीय व्यापारी परिसंघ (सीएआयटी)ने भारत सरकारला, सध्याच्या स्थितीत सिंथेटिक पॉलिमरपासून नोटा छापण्याचा सल्ला दिला आहे. याने कोरोना संक्रमणाचा धोका टाळता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’