लोणंद प्रतिनिधी | सुशिल गायकवाड
खंडाळा तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेले साखळी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूंचा संसर्ग पाहता प्रशासनाला सहकार्य करणे महत्वाचे समजून मराठा क्रांती मोर्चा यांच्याकडून साखळी ठिय्या आंदोलन हे २७ फेब्रुवारी पासून तात्पुरते काही काळासाठी स्थगित करण्यात आलेले आहे.
यासाठी खंडाळा सह वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, असवली, कण्हेरी, लोहम, झगलवाडी, लिंबाचीवाडी, घाडगेवाडी या गावातील मराठा बांधवांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.तसेच खंडाळा तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाठींबा दर्शविला.
खंडाळा तालुका डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मराठा बांधवांना आरक्षण मिळावे.ही बौद्ध बांधवांची इच्छा आहे. मराठा हा आमचा मोठा भाऊ आहे,त्यांना आरक्षण मिळावे. यासाठी प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात कमी पडणार नाही, असे समितीकडून म्हटलेले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.