मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, सगळ्या मंत्र्यांना घरी बसवतो; अभिजीत बिचकुलेचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सातारा | राज्यावर पुन्हा लॉकडाऊनचा संकट आणण्याच्या मनस्थितीत मंत्रिमंडळ आहे. सगळं सुतासारख सरळ करतो. यांच्या मंत्र्याना दोन मिनिटांत घरी बसवतो. तेव्हा लॉकडाऊनच संकट येवू नये म्हणून तुम्ही मला एक दिवसांचा मुख्यमंत्री करा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून बिग बॉस फेम अभिजीत बिचकुले यांनी केली आहे.

अभिजीत बिचकुले म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशापुढे जावून जे नालायक जे अधिकारी काम करतात, त्या बाडगूळ अधिकाऱ्यांची नांवे पण घ्यायची नाहीत मला कारण अभिजीत बिचुकलेने अधिकाऱ्यांच नांव घेतले की तो अधिकारी मोठा होईल.

तसेच, अधिकारी नोकर आहेत, त्यांना वठणीवर आणले पाहिजे. राजकीय नेते नाही तर प्रशासकीय अधिकारी भ्रष्टाचारी आहेत. यांच्यात बदल करायचा असेल तर आरक्षणात बदल नको तर न्यायपालिका पहिल्यांदा सुधाराव्यात. लोकशाहीत लोकांच्या जीवावर मंत्री होवून स्वताःची घरे भरतायत. तुमचे बदनाम मंत्री वाचवायला बसला आहात असं बिचकुले म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like