कोरोनाने घेतला आई अन् शिक्षक मुलाचा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विहामांडवा : कोरोना महामारीमुळे अनेकांनी जवळची माणसे गमावली. अशीच धक्कादायक घटना विहामांडव्यात घडली आहे. अवघ्या पाच दिवसात आई आणि शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुलाचा कोरोनाने बळी घेतला. विहामांडव्यातील उमेश नांदरे हे पाचोड जवळील थेरगाव येथील विद्यालयात शिक्षक होते. गेल्या आठवड्यात उमेश नांदरे यांच्या आई आणि रेणुकादेवी शरद कारखान्याच्या माजी संचालिका कौशल्याबाई (59) यांना कोरोना ची लागण झाली. त्यांना उपचारासाठी नेवासा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, घरातील अन्य सदस्यांचे तपासणी केल्यानंतर शिक्षक उमेश नांदरे (33)पॉझिटिव्ह आले. उपचार सुरू असलेल्या आईचे गेल्या आठवड्यात निधन झाले.
दुसरीकडे औरंगाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उमेश नांदरे यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी त्यांचाही मृत्यू झाला. दोन वर्षापूर्वी शिक्षक उमेश नांदरे यांच्या आठ वर्षाच्या मुलीचे अल्प आजाराने निधन झाले होते. त्या दुःखातून नांदरे कुटुंब सावरत नाही तोच कोरोनाची वक्रदृष्टी त्यांच्या आईवर पडली.

नंतर उमेश नांदरे यांचेही या आजाराने निधन झाले. वर्ष 2009 पासून या शाळेत विद्यार्थी हिताला प्राधान्य देऊन त्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत सामाजिक बांधिलकी जोपासली होती. असा कर्तबगार शिक्षक संस्थेत मिळणे दुरापास्त आहे, संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री अनिल पटेल यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले संस्थेच्या सचिव रंजना पाटीदार,निमेश पटेल,उपाध्यक्ष सुभाष पाटील, मनोहर घायाळ,बापूसाहेब गोजरे,अरुण तांबे दिलीप सनवे प्राचार्य गणेश तांबे आदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Leave a Comment