औरंगाबादकरांच्या कोरोना चाचणीवर दररोज ३० लाखांचा खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात २६ मार्चपर्यंत ६.८४ लाख जणांची कोरोना तपासणी झाली आहे. गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी सहा हजारांच्या वर रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. औरंगाबादकरांच्या रोजच्या या चाचणीसाठी सुमारे ३० लाखांचा खर्च होत आहे.

कोरोनाचे स्वॅब सुरुवातीला तपासणीला पुणे येथे एनआयव्हीला पाठवले जात होते. त्यानंतर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विषाणू निदान प्रयोगशाळा सुरू झाली. ॲण्टिजनचीही सुविधा झाली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तपासण्यांत आरटीपीसीआरच्या तपासण्या चार लाखांपर्यंत झाल्या आहेत, तर अडीच लाखांच्या दरम्यान ॲण्टिजन तपासण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात १९ ते २६ मार्चदरम्यान ४० हजार ७९८ आरटीपीसीआर सॅम्पल्स घेण्यात आले. त्यापैकी ११ हजार ५८१ रुग्ण बाधित आढळून आले. खासगी लॅबमध्ये या काळात ३७०२ सॅम्पल तपासणीसाठी देण्यात आले. त्यातून १०१८ रुग्ण बाधित आढळून आले. आतापर्यंत खासगी लॅबमध्ये २९ हजार ५२८ तर शासकीय प्रयोगशाळेसह ॲण्टिजनच्या माध्यमातून ६ लाख ५४ हजार ९९२ तपासण्या २६ मार्चपर्यंत करण्यात आल्या.

त्यानुसार किमान २५ कोटींपेक्षा अधिक खर्च शासनाने केवळ तपासणीवर केला असण्याची शक्यता आहे, असे डॉ. गुलाब खेडकर म्हणाले. शहरात खासगी २ प्रयोगशाळाही सेवा देत होत्या. हजार ते १२०० रुपये ते तपासणी शुल्क आकारत होत्या. मात्र, त्यांच्या सेवा मनपाकडून गेल्या आठवड्यात बंद करण्यात आल्या. खासगी लॅबलाही विचारणा केली असता कोरोना तपासणीला त्यांनी नकार दिला. त्यामुळे बहुतांश कोरोना तपासण्या दोन्ही शासकीय प्रयोगशाळांकडून होत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment