कराडच्या तहसील कार्यालयात येणाऱ्या दीडशे जणांची कोरोना टेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे प्रशासकीय कार्यालयात महत्वाच्या कामासाठीच नागरिकांनी यावे, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, नागरिकांकडून कराडच्या प्रशासकीय कार्यालयात गर्दी केली जात असल्यामुळे कामाव्यतिरिक्त येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, कामानिमित्त कराड येथील प्रशासकीय कार्यालयात नागरिकांकडून गर्दी केली जात असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसात तब्बल दीडशे जणांची कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी शेखर सिह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड येथील प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीनुसार सोमवारी 60 तर मंगळवारी 90 अशा दीडशे जणांची अॅन्टीजेन चाचणी करण्यात आली आहे. कराड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आरोग्य विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे.

कराड येथील प्रशासकीय कार्यालयात अनेक महत्वाचे विभाग कार्यरत आहेत. त्या विभागांमध्ये दररोज नागरिक काहींना काही काम घेऊन येत आहेत. या ठिकाणी तहसीलदार यांचे कार्यालयही असल्यामुळे लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांतून लोक येत आहेत. तर अनेक प्रशासनातील विभागांतील अधिकारी, कर्मचारीही या ठिकाणी येत आहेत. येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या नागरिक व कर्मचाऱ्यांच्या गर्दीमुळे कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या आरोग्यह्याच्या हितासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचायांची अॅंन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांत तब्बल दीडशे जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चाचणीत सर्वांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Comment