अहो आश्चर्यम ! मृत महिलेस दिली कोरोना लस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ओमिक्रोनचा वाढता धोका लक्षात घेऊन सध्या लसीकरणावर भर दिला जात आहे. अशातच कोरोनाने मयत झालेल्या महिलेवर आरोग्य यंत्रणेनेच अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर चक्क सात महिन्यांनी 18 डिसेंबर रोजी तिला कोविडचा पहिला डोस दिल्याचा संदेश पाठवल्याने आरोग्य खात्यामधला सावळागोंधळ पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जिल्ह्यातील उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्वताबाई अहेलाजी पाटील (78) यांनी 18 डिसेंबर 2021 रोजी 1 वाजून 5 मिनिटांनी लसीकरणाचा पहिला डोस घेतल्याची नोंद आहे. याबाबत त्यांच्या मुलगा सूर्यभान पाटील यांच्या मोबाइलवर पार्वताबाई यांनी कोविशिल्ड लस घेतल्याचा संदेश आला. त्यानंतर त्यांचे लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्रसुद्धा आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे.

परंतु पार्वताबाई या 21 एप्रिलला आजारी पडल्याने त्यांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. कोरोना चाचणीत त्या पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर घाटीतच उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे 2 मे रोजी निधन झाले. पार्वतीबाईंच्या मृत्यूची घाटी रुग्णालयासह सिडको पोलीस ठाण्यात नोंद असून, सिडको एन-8 भागातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे.

Leave a Comment