१५ ऑगस्ट पर्यंत येणार कोरोना वॅक्सीन ? ICMR ने केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या लसीची भारतासह जगभरात आतुरतेने प्रतिक्षा केली जात आहे. कोविड 19ची लस तयार करण्याचे काम जगभरातील अनेक वैज्ञानिक करीत आहेत. लवकरच या दिशेने यश मिळण्याची भारताला आशा आहे. कारण कोविक्सिन ही कोविड 19 वरची लस भारतात तयार केली जात आहे. भारतात तयार केल्या जाणाऱ्या या लसीची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे आदेश नुकतेच देण्यात आलेले आहेत. जर सर्व काही ठीक झाले तर 15 ऑगस्ट रोजी ही लस लॉन्च केली जाऊ शकते. इंडिया बायोटेक आणि आयसीएमआर यांनी संयुक्तपणे ही लस विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

आयसीएमआरने इंडिया बायोटेकला याची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. हैदराबादस्थित औषध कंपनी भारत बायोटेकला या लसीच्या ह्यूमन ट्रायलसाठी नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पत्र लिहून याची क्लिनिकल चाचणी पूर्ण करण्याचे आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी भारत बायोटेकला निर्देश दिले आहेत. या चाचणी नंतर, 15 ऑगस्ट रोजी ही लस लॉन्च केली जाऊ शकते.

ही लस पूर्णपणे स्वदेशी आहे. या कंपनीला आयसीएमआरने 30 जून रोजी ह्यूमन ट्रायलसाठी मंजूरी दिली. डीसीजीआयनेही या लसीच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि आयसीएमआरच्या सहकार्याने कंपनीने याची रचना केली. ही चाचणी यशस्वी झाल्यास कोरोनाहून युद्धासाठी भारताकडे एक मोठे शस्त्र असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत बायोटेकशिवाय Zydus Cadilla देखील कोरोना व्हायरसवर लस तयार करण्यात गुंतले आहेत. आयसीएमआरकडून या लसीच्या ट्रायलसाठी देखील मंजूरी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment