Thursday, March 23, 2023

Don’t worry…! कोणताही मेडिक्लेम असला तरी ‘कोरोना फ्री’ होणारचं

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोरोना  व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत.  त्यामुळे पुणे महापालिकेने काही तासांत वेगळा विभाग उभारला असून औषधांचा साठाही मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसवरील उपचार घेताना लोकांना आता खर्चाच्या चिंतेने ग्रासले आहे. मात्र, यासाठी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.

या आजारावर मात करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे. यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. मात्र ताप, सर्दी असल्यास खासगी दवाखान्यात दाखल झाल्यास त्याचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी तो रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास हा रोगच कोणत्याही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये नसल्याने इन्शुरन्स कंपन्या क्लेम नाकारण्याची शक्यता होती.

- Advertisement -

मात्र, विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या इरडाने विमा कंपन्यांना सूचना केल्या आहेत. यामध्ये ज्या मेडिक्लेममध्ये दवाखान्याचा खर्च सहभागी आहे. त्यामध्ये कोरोना व्हायरसशी संबंधीत खर्चाचाही तात्काळ समावेश करावा असे सांगितले आहे. हे आदेश इरडा कायदा, 1999 च्या कलम 14 (2) (e) नुसार जारी करण्यात आले आहेत.