‘या’ गोष्टींवर मंत्र्यांनी दर्शवली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय याबाबत मंत्र्यांनी आक्षेप नोंदवला अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासन त्यांच्या स्तरावर वेगवेगळे निर्णय घेत आहेत आणि आदेश काढत आहेत. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसारही राज्यात गोष्टी होत नसल्याची बाब अनेक मंत्र्यांनी बैठकीत समोर आणली. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सुरू ठेवण्याबाबत मुख्य सचिवांनी आदेश काढला, पण वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त परस्पर वेगळेच निर्णय घेत आहेत. कोणी काही तासांसाठी दुकानं सुरू ठेवतो, तर कोण एक दिवसाआड, यामुळे राज्यात गोंधळ उडत असल्याचं मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. या सर्व कारणांमुळं मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांचा प्रशासकीय यंत्रणाविषयी नाराजीचा सूर लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment