देशात गेल्या 3-4 दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ, 22 जिल्ह्यांनी वाढवली चिंता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्ली, मुंबई, पुणे, ठाणे, बंगळुरू, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, नाशिक या शहरांमध्ये कोविड-19 च्या एकूण रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याबद्दल केंद्राने गुरुवारी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 परिस्थितीबाबत मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेला संबोधित करताना, आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की,”26 डिसेंबरपासून भारतातील दररोज कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत आहेत.” सचिव पुढे म्हणाले की,”जे जिल्हे चिंताजनक आहेत त्यांच्या संपर्कात केंद्र आहे.”

भारतातील कोविड-19 परिस्थिती आणि लसींबद्दल आरोग्य मंत्रालयाने काय म्हटले आहे ते येथे आहे-

1. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ही सर्वाधिक ऍक्टिव्ह कोविड प्रकरणे असलेली पाच राज्ये आहेत.

2. भारतातील आठ जिल्ह्यांमध्ये विकली पॉझिटिव्हिटी रेट 10% पेक्षा जास्त आहे. यापैकी सहा मिझोराममध्ये, 1 अरुणाचल प्रदेशात आणि 1 पश्चिम बंगालमध्ये (कोलकाता) पडतात.

3. भारतातील 14 जिल्ह्यांमध्ये विकली पॉझिटिव्हिटी रेट 5% आणि 10% दरम्यान आहेत, ज्यात केरळमधील 6, मिझोराममधील 4, अरुणाचल प्रदेश, आसाम, झारखंड आणि मणिपूरमधील 1-1 आहेत.

4. केंद्राने सांगितले की, हा व्हायरस म्यूटेट होत आहे, ज्यासाठी जनतेकडून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

5. संसर्गानंतर प्रतिकारशक्तीबद्दल बोलताना, ICMR महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की,” संसर्गानंतरची प्रतिकारशक्ती सुमारे नऊ महिने टिकून राहते.” आंतरराष्ट्रीय आणि भारतीय अभ्यासाचा दाखला देत डॉ. भार्गव म्हणाले,”लसीकरणानंतरची प्रतिकारशक्ती देखील सुमारे 9 महिने टिकते.”

6. NITI आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्हीके पॉल म्हणाले,”R चे मूल्य 1 पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ केसेस कमी होत नाहीत.”

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 13,154 रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, दिल्लीमध्ये 263 आणि महाराष्ट्रात 252 प्रकरणांसह ओमिक्रॉन व्हेरिएन्टच्या प्रकरणांची संख्या 961 वर पोहोचली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशात नवीन प्रकरणे आढळल्यानंतर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 82 हजार 402 वर पोहोचली आहे. या कालावधीत 7 हजार 486 लोकं बरेही झाले असून, त्यानंतर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 42 लाख 58 हजार 778 झाली आहे.

Leave a Comment