हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोना विषाणूचा संसर्गाची प्रकरण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला उद्देशून संबोधन केलं. आपण एका विषाणू सोबत जागतिक युद्ध लढत आहोत तेव्हा एकजुटीनं लढण्याची गरज आहे. राज्यातील जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा, सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नका, सरकारने दिलेल्या सूचना पाळा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.
युद्धाचा भोंगा वाजला आहे, कोरोनाशी लढणासाठी डॉक्टर, नर्स, बसचे कर्मचारी यांच्यासह सर्वच यंत्रणा आपआपल्यापरीनं लढत आहे. मी राज्यातील जनतेला आवाहन करतो की त्यांनी घरी राहावं. अनावश्यक प्रवास टाळावा, असं मुख्यमंत्री म्हणाले. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणा सक्षम आहेत. करोनाविरोधातील लढा हे एक युद्ध आहे. ते युद्ध लढण्यासाठी सरकारला जनतेचं सहकार्य हवं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
‘राज्यात करोनाचा शिरकाव परदेशातून आलेल्या नागरिकांमुळेच झाला. ते काही परदेशी नव्हते. ते परदेशात फिरण्यासाठी गेले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना संसर्ग झाला आणि करोना वाढला आहे. सध्या सरकार लागण झालेल्यांना विलगीकरण करत आहेत. काहींना घरीच वेगळं राहण्याचं सांगण्यात आलं आहे. पण, ते हे लपवून सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. त्यामुळे मी विनंती करतो की, नागरिकांनी सरकारकडून दिलेल्या सूचनाचं पालन करा,’ असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.