कोरोनामुळे देहू, आळंदी पायी पालखी सोहळा इतिहासात पहिल्यांदाच रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदाचा देहू, आळंदी पायी पालखी सोहळा रद्द होण्याची अटकळ लावली जात होती. दरम्यान, आज सामाजिक भान राखत यंदा पायी पालखी सोहळा रद्द केला आहे.

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झालं. उपमुख्यमंत्री आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची यावर चर्चा झाली.

या बैठकीत आळंदी आणि देहूवरून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या. त्यानंतर आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एस टी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका मांडण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment