राज्यात कोरोनाचा हाहाकार!! तब्बल ६३ हजार २९४ रुग्णांची भर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने हाहाकार केला असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून देखील रविवारी कोरोनाचा विस्फोट झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात एकूण ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के इतका आहे. याबरोब राज्यात काल ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ टक्क्यांवर आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल टास्क फोर्सची बैठकही घेतलीय. या बैठकीत 8 दिवसांचा लॉकडाऊन लावावा, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी किमान 14 दिवसांचा लॉकडाऊन पाहिजे, तर आपण कोरोनाची साखळी तोडू शकते, असं मत मांडलंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत लॉकाडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment