Monday, February 6, 2023

करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये लोकांची वर्दळ पाहता खबरदारी म्हणून इतर देवस्थानांप्रमाणेच शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने पुढील १५०० तासांसाठी भाविकांना मंदिर प्रवेश बंद केला आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत भाविकांच्या मंदिर प्रवेशावर बंदी घातल्याचे शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आलं आहे. याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतरही देवस्थानं प्रशासनांनी करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन भाविकांना मंदिर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ही देवस्थानं करण्यात आली आहेत बंद

- Advertisement -

१. तुळजापूर – तुळजाभवानी
२. मुंबई – सिद्धीविनायक
३, शिर्डी – साईबाबा मंदीर
४. शेगाव – गजानन महाराज मंदीर
५. बीड, अंबेजोगाई – अंबाबाई मंदीर
६.पंढरपूर- विठ्ठल-रखुमाई मंदिर

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.