करोना फोफावतोय! देशात करोनाग्रस्तांची संख्या २९८ नॉट आऊट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस राज्याला पडलेला करोनाचा विळखा आणखी बळकट होताना दिसत आहे. कारण भारतातील करोनाग्रस्तांची संख्या आता नॉट आऊट २९८ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशभरातल्या जनतेने घाबरुन जाऊ नये आणि स्वतःला सुरक्षित ठेवावं असं आवाहन सरकारने नागरिकांना केलं आहे.

तसंच सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असंही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर देशभरात आजपासून १११ नव्या लॅब सक्रिय झाल्या असल्याचीही माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांच्या संख्येत सुद्धा वाढ झाली असून ती आता ६४ झाली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment