व्हेजिटेबल बटरमुळे वाढतोय कोरोना; राज्य शासनाचे केंद्राला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अनके दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अनेकांनी जीव पण गमावला आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लोकांकडून दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढत आहे.अश्यातच राज्य सरकारकडून केंद्र सरकारला पत्र पाठवून व्हेजिटेबल बटर मुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत आहे. व्हेजिटेबल बटर आणि दुग्धजन्य बटर त्यांचा कलर सेम असल्याने लोकांची फसवणूक होत आहे . बटर म्हंटल कि दोन प्रकारच्या बटरांचा समावेश होत आहे.

महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात म्हंटल आहे कि , भाज्यांपासून तयार होणारे बटर आणि दुधापासून तयार होणारे बटर यामध्ये फरक असला पाहिजे. दोघांचा कलर एकसारखा असल्याने त्यातील फरक समजून येत नाही. कलर वेगळा असावा अशी मागणी केंद्र सरकारला केली आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात लोकांकडून रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बटर ची मागणी करण्यात येत आहे. परंतु स्वस्त रित्या उपलब्ध झालेले बटर हे भाज्यांपासून बनलं गेलं आहे ते लोकांना माहित होत नाही. दुग्धजन्य पदार्थ ओळखण्यासाठी वेगळ्या पद्धतीचा किंवा कलर चा वापर केला जावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुनील केदार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले कि ” देशातील दुग्धजन्य पदार्थांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर सरकारी दूध कंपन्यांशी चर्चा करण्याचं काम सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये मागे दुग्ध पदार्थचे कमी सेवन किंवा त्याजागी अन्य पदार्थांचे सेवन हे कारण असू शकत. यामुळे रोग प्रतिकार शक्ती वर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून यासाठी मदत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या महामारीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर त्याला आपण प्रतिकार करू शकतो.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment