कोरोनामुळे बाजारात ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली; महागड्या मास्कची गरज नसल्याचं डॉक्टरांचं मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना’ व्हायरसचे रुग्ण भारतातही सापडल्याने राज्यासह जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. इराण आणि हाँगकाँगमधून आलेल्या जिल्ह्यातील २ व्यक्‍तींची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. मात्र नागरिक चांगलेच सतर्क झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे बाजारात एन-९५ मास्कची मागणी वाढली आहे. आणि या मास्कची किंमत जवळपास १५० ते २०० रुपायाच्या घरात आहे.

मात्र नागरिक तरीही हे मास्क विकत घेत आहेत. या मास्कची मागणी वाढली मात्र हे मास्क सध्या बाजारात नाहीत. रोजच्या वापरात असलेले १ ते ३० रुपयांचे उपलब्ध आहेत. मात्र नागरिक एन-९५ मास्कची मागणी करत आहेत. पण एन-९५ मास्क वापरायची गरज नाही अशी माहिती मेडिकलवाल्यांनी दिली आहे, त्याचबरोबर डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment