कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून ओळखला जाईल; मनसेचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून नवीन निर्बंध येण्याची शक्यता आहे. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सरकार वर टीका केली आहे. कोरोना हा महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

याबाबत संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हंटल की, महाराष्ट्रात करोना च एव्हढं स्तोम माजवल जातंय की यापुढे करोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. सरकारनी करोना संबधित सर्व डेटा जनते बरोबर पारदर्शक पणे शेअर केला पाहिजे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले-

गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपलं आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल होत. तसेच लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment