हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तब्बल 5 महिन्यापासून देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू वर फक्त 1 रुपयात घरगुती पध्दतीने रामबाण उपाय असल्याचं धक्कादायक वक्तव्य आंध्रप्रदेशचे रंगा व्यंकटराव यांनी केलं आहे.तसेच हा दावा खोटा ठरल्यास 5 लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असंही ते म्हणाले.रंगा व्यंकटराव याना यापूर्वी त्यांनी केलेल्या निस्वार्थी सेवे बद्दल त्यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालं आहे.
रंगा व्यंकटराव म्हणाले , आपण आपल्या दोन्ही नाकपुड्या मध्ये लिंबाचा रस ठेवल्यास नाक घसा आणि फुफ्फुसामध्ये पडलेला विषाणू कफ स्वरूपात तोंडातून बाहेर येतो.नंतर आपल्याला ते थुकावे लागते.त्यानंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ घालून गुळण्या कराव्या.मग आराम मिळेल . त्यानंतर नाकपुडी मध्ये बोटांनी खोबरेल तेल लावावे.
तर अशा या घरगुती उपाया नंतर जर हे सिद्ध झाले की कोणाला आराम भेटला नाही तर त्याला 5 लाख रुपये बक्षीस देण्यास ते तयार आहेत.