राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवरून राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सतत सरकारचा पाठपुरावा करताना दिसत आहेत. पर्यायाने सरकारवर आरोपांचे सत्र ही सुरूच आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची हाताबाहेर जात असलेली स्थिती, ऑक्सिजनअभावी रूग्णांचे मृत्यू आणि कोरोना मृत्यूसंख्या दाखविण्यात अद्यापही पारदर्शितेचा अभाव याबाबींकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहिले असल्याचे आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी सांगितले.

मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होते आहे. १९ जून रोजी राज्यात सर्वाधिक ३८२७ रुग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी राज्यातील मृतांची सर्वाधिक संख्या ११४ होती. तसेच १८ जूनपर्यंत राज्यातील एकूण रुग्णांपैकी ५२.१८% रुग्ण मुंबईतील होते. त्याचबरोबर राज्यातील एकूण रुग्णांच्या पैकी गेल्या १८ दिवसात ४३.८६% रुग्ण आढळले आहेत. सातत्याने कोरोना बळींची रुग्णसंख्या लपविली जात आहे. असे सांगून त्यांनी आकडेवारीमध्ये पारदर्शितता आणावी अशी विनंती केली आहे. आणि जसे आपण म्हणता हे युद्ध कोरोनाविरुद्धचे असून आकडेवारीविरुद्धचे नाही तर मग जनतेसमोर आकडेवारी मांडणे गरजेचे आहे असेही त्यांनी या पत्रात म्हंटले आहे.

 

या पत्रात त्यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात १० रुग्ण हे ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने मृत्युमुखी पडले असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आधीच वाढणाऱ्या रुग्णसंख्येत मानवी चुकांमुळे भर पडणार असेल तर हा गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालून हे दोष दूर करावेत असे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना या पत्रात म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment