औरंगाबाद | कडक निर्बंध लागून एक महिना होत आहे. तरी देखील शहरातील नागरिकांना अजून काही भान नाही. शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे या सोबतच नागरिकांचे निष्काळजी पाना दिसून येत आहे. नागरिकांनी नियम पाळायला पाहिजे. शहरामधील मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडी येथील भाजी मंडई नागरिकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी केली असताना नागरिकांकडून नियमाचे उल्लंघन करण्यात दिसून आले.
भाजी मंडई मध्ये भाजी विक्रेता हा विना मास भाजी विकत असताना दिसून आला. तसेच काही भाजी पाला खरेदी करण्यासाठी आलेले नागरिक देखील विना मास फिरताना दिसून आले.प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. विना मास बाहेर पडू नका शासनाने जे निर्बंध दिलेले आहे. ते कडेकोट पणे पालन करा. तरी देखील नागरिकांनी नियम धाब्यावर ठेवत विना मास फळे भाजी विक्री चालू होती.
यावरूनच लक्षात येते की औरंगाबादकरांना लॉकडाऊन आणखी देखील वाढून घ्यायचा आहे असं वाटतं लॉकडाऊन वाढून घ्यायचा नसेल तर शासनाने निर्बंध दिले आहे. निर्बंध पाळू या आणि कोरोना ला टाळू या.