कोरोनाचा सोन्यावर परिणाम, मागणी नसल्याने ढासळल्या किंमती; जाणुन घ्या आजचा भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरंतर वाढ झाल्यानंतर सोने आता स्वस्त झाले आहे,तर चांदीही घसरली आहे,दहा ग्रॅम सोन्याचा दर जाणून घ्या – सोन्याच्या किंमती सतत वाढल्यानंतर आता सोन्याच्या किंमती शुक्रवारी कमी झाल्या आहेत. ताज्या किंमतीनुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत आता १२१५ रुपयांनी स्वस्त होऊन ४५७१३ रुपये इतकी झाली आहे.यापूर्वी गेल्या ४ दिवसांपासून सोन्याचा भाव बर्‍याच उंचीला स्पर्श करत होता. ज्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच लोकांमध्येही चिंता वाढली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव तेजीत असल्याचे सांगण्यात येत आहे, त्याचा परिणाम भारतीय बाजारातही दिसून आला आहे.

असे म्हणायला हवे की, सर्वसाधारण जनता वगळता इतर केंद्रीय बँका, फंड मॅनेजर, स्वतंत्र गुंतवणूकदार इत्यादी वेगवेगळ्या एक्सचेंजवर सोन्याची खरेदी करत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे सध्या सराफा बाजार बंद आहे.

याप्रमाणे आहेत सोन्याचे दर

चांदीच्या किमतीही खाली आल्या

कोरोना विषाणूमुळे हजारो लोक मरण पावले आहेत तर कोट्यावधी लोकांना याचा संसर्ग झाला आहे. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी, अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे ज्यामुळे आर्थिक यंत्रणेवरही याचा मोठा परिणाम झालेला आहे.याआधीच शेअर बाजारही खूप कमकुवत झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment