सातारा जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा आकडा वाढला ः गेल्या चोवीस तासात 1 हजार 666 बाधित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात सोमवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 666 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 18 हजार 812 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 96 हजार 722 आहे. तर जिल्ह्यात एकूण 75 हजार 486 बरे झाले ली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 2355 बाधितांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या तीन दिवसांत दीड हजारांपेक्षा जास्त बाधितांचा नवा उंच्चाकी आकडे जिल्ह्यात येत आहेत. तर कोरोमुक्तीचा आकडाही दिलासादायक येत आहेत. रविवारी दिवसभरात 1 हजार 898 रूग्ण बरे होवून घरी गेले ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. मात्र सोमवारी रात्री नव्याने आलेल्या 1 हजार 633 बांधितांच्यामुळे जिल्ह्याची परिस्थिती जैसे थे आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment