कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. देशात 2 हजार 958 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 126 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढला असून तो 28.71वर पोहचला आहे. एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 15 हजार 535 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 617 जणांचा बळी गेला आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवाडीत महाराष्ट्र महिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 2 हजार 819 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

तर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये 6 हजार 245 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये 1381 लोक बरे झाले असून 368 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली कोरोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर असून 5 हजार 104 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्लीत 64 जणांचा मृत्यू झाला असून 1468 जण बरे झाले आहेत. मध्यप्रदेश 3049, पंजाब 1451, राजस्थान 3158, तमिळनाडू 4058, तेलंगाणा 1096, उत्तर प्रदेश 2880, पश्चिम बंगालमध्ये 1344 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर अरुणाचल प्रदेश 1, दादरा नगर हवेली 1, मणिपूर 2, मिझोराम 1, पदुच्चेरीमध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. गोव्यात 7 कोरोना रुग्ण होते मात्र ते सातही जण कोरोनामुक्त झाले असून आता गोव्यात एकही कोरोना रुग्ण नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’

 

Leave a Comment