कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ३३ तात्पुरती कारागृह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग नियम पाळले जात आहेत. अशा वेळी कारागृहातील कैद्यांचा देखील विचार केला जात आहे. कारागृहातील कैद्यांची गर्दी कमी व्हावी म्हणून राज्यभरात ३३ तात्पुरती कारागृह निर्माण करण्यात आली आहेत. कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसपूर्वी राज्यातील कारागृहात क्षमतेपेक्षा दीड पट अधिक कैदी होते. कारागृहाच्या इतिहासात पाहिल्यादाच क्षमते एवढेच कैदी कारागृहात राहतील अशी उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. कारागृहात येणाऱ्या नवीन कैद्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं दिसून आलं; त्यामुळे कारागृहात नवीन बंदीना ठेवलं जातं नाही अशी व्यस्था करण्यात आली होती.

मुंबई मधील अर्थररोड जेलमध्ये ४ मेला कोरोना व्हायरसचा शिरकाव केल्याच पहिल्यादा दिसून आलं. अर्थर रोड जेल मधील २३४ कैद्यांचे स्वाब घेण्यात आले.. त्या मधील १५८ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याच दिसून आलं होतं. २० मेला १५८ कैद्याच्या बरोबर २०० जणांचे अधिक स्वाब घेण्यात आले; त्यामध्ये ५८ कैदी पॉझिटिव्ह आढळून आले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment