Wednesday, June 7, 2023

अखेर कोरोनाव्हायरसचा भारतात प्रवेश; वुहानहुन परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोना विषाणूची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : चीनच्या वुहान शहरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना विषाणूचा आज अखेर भारतात प्रवेश झाला. चीनच्या वूहानहुन परतलेल्या केरळमधील विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाली आहे. भारतात बरोबरच इतर देशांमध्येही हा विषाणू वेगाने पसरत आहे. श्रीलंका, इंडोनेशिया, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया यासह अनेक देशांमध्ये हा विषाणू पोहोचला आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 170 वर आला आहे. तर 7783 लोकांना याची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याचवेळी, भारतातही कोरोना विषाणूच्या पहिल्या घटनेची पुष्टी झाली आहे. या विषाणूचा भारतात प्रसार होऊ नये म्हणून चीनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे.