राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर; ३ महिन्यांची स्थगिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यावरील कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नसल्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका ३ महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. याआधीही मार्च महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलत असल्याची घोषणा केली होती. पण अद्यापही राज्यात कोरोनाचं संकट कायम असल्याने निवडणुका अजून ३ महिने पुढे ढकलण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या निर्णयामुळं राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, गोकूळ सारखे दूध संघ, बाजार समित्या, साखर कारखाने, गृहनिर्माण संस्था अशा अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आता सप्टेंबरपर्यंत लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यात डिसेंबर २०१९ अखेर १६ हजार ३७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. तर यावर्षी डिसेंबर अखेर ३० हजार ५४ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका,साखर कारखाने, दूध संघ अशा सहकरी संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत सत्तासंघर्ष उफाळून येत असतो. पण कोरोनामुळे सध्या या निवडणुका लांबणीवर पडल्यानं सगळीकडे शांतता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”