बडे दिलवाला ‘खिलाडी’ कुमारकडून मुंबई पोलिसांना ‘इतक्या’ कोटींची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे आले आहेत. बऱ्याच सिने कलाकारांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली आहे तर अनेकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत देऊ केली आहे. तर अनेक सेलिब्रिटींनी डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स दिलेत. अभिनेता अक्षय कुमारनं देखील लोकांच्या जीवासाठी रस्त्यावर दिवस रात्र पहारा देणाऱ्या मुंबई पोलिसांना २ कोटींची मदत केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी अक्षयचे आभार देखील मानले आहेत. शहराचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या मुंबई पोलिसांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरेल’, असं त्यांनी म्हटलं आहे.

अक्षयनं यापूर्वी देखील मुंबई महानगर पालिकेला ३ कोटींची मदत केली होती. मुंबईतील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मुंबईची लोकसंख्या पाहाता मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करणं हे एक आवाहन आहेत. यासाठी टेस्टींग किट्स आणि मास्क कमी पडू नयेत यासाठी अक्षयनं पालिकेला ही ३ कोटींची मदत केली होती. तर पंतप्रधान सहाय्यता निधी साठी अक्षयनं २५ कोटींची मदत केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment