दिलासादायक! ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली आपलं राज्य करोनामुक्त झाल्याची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील बहुतांश राज्य कोरोनाशी झगडत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू व इतर राज्यात परिस्थिती गंभीर आहे. या राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपलं राज्य कोरोनमुक्त झाल्याची दिलासादायक माहिती दिली आहे. रविवारी गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. गोव्यामध्ये कोरोनाचे ७ रुग्ण होते. मात्र हे ७ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गोवा कोरोनामुक्त झाले असले तरी राज्य सरकारने नागरिकांनी लॉकडाउनचे निर्बंध पाळावेत, सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करावा असं आवाहन केलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली. “गोव्यासाठी समाधानाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. गोव्यातील शेवटच्या करोना रुग्णाची चाचणीही निगेटीव्ह आली आहे. सर्व डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी त्यांनी केलेल्या कामासाठी कौतुकास पात्र आहेत. ३ एप्रिलपासून गोव्यामध्ये एकही नवा रुग्ण अढळून आलेला नाही,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार गोव्यामध्ये ७५८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली होती. त्यापैकी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं होतं. या सातही जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यामध्ये ३ एप्रिल रोजी करोनाचा शेवटचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर राज्यात एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनीही त्यांच्या ट्विटरच्या औपचारिक हॅण्डलवरुन ट्विट करत गोव्यामधील सर्व ७ रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. मात्र राज्यात करोनाचा रुग्ण नसला तरी लॉकडाउनचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत राणे यांनी व्यक्त केलं आहे. “सध्या राज्यात करोनाचा एकही रुग्ण नाहीय. त्यामुळे लॉकडाउनचे नियम पाळणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवणे तसेच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे आपली जबाबदारी आहे,” असं राणे म्हणाले आहेत.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

 

Leave a Comment