Tuesday, February 7, 2023

राज्यातील रुग्णांची संख्या ६३ वर;आज वाढलेल्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेले ८

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी ती ६३ वर पोहोचली आहे. एका दिवसात राज्यात करोनाचे ११ रूग्ण वाढले आहेत. त्यापैकी आज वाढलेल्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेले ८ तर संसर्गातून तिघांना लागण लागण झाल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. तसेच राज्यातील ६३ पैकी १२ ते १४ जणांना संसर्गातून लागण झाली आहे. राज्य अजूनही स्टेज २ मध्येच आहे. पण परिस्थिती अशीच कायम राहिल्यास चिंतेची बाब निर्माण होईल असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चाचणी केंद्र वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनाही राज्यातील परिस्थितीचा आढावा देण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.