निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची बाब पोलिसांच्या अहवालात समोर आली आहे. दरम्यान आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या सर्वाना शोधण्याचं मोठं आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

मरकजमधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेलेले 47 जण औरंगाबाद शहरात परत आले आहेत. औरंगाबादेत आतापर्यंत 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे मिळून किमान 136 व्यक्ती आहेत, जे दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांना क्वॉरंटाईन करणं सुरू झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील 16 जण उपस्थित असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील 16 जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. यामध्ये शहरी भागातील 6 तर ग्रामीण भागातील 10 जणांचा समावेश आहे.

चंद्रपूरच्या राजुरा शहरातही एक संशयित रुग्ण आढळला. निजामुद्दीनमधील कार्यक्रमातून हा व्यक्ती परतला आहे. सदर व्यक्तीला सध्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील 13 लोकांचा समावेश होता. अकोल्यातील 4, बार्शिटाकळी आणि पातूर तालुक्यातील प्रत्येकी 3 जणांचा यामध्ये समावेश आहे. परभणीत देखील दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील जमातमध्ये गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान आता निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम ‘मरकज’ बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.कोरोनाच्या संसर्गाचं केंद्र ठरलेल्या दिल्लीतील या धार्मिक स्थळी 2137 जण सहभागी झाले होते. या ठिकाणी आलेल्या 2137 पैकी 303 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे. यापैकी 1203 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. 10 राज्यात 800 लोकांचा शोध सुरु आता सुरु आहे. यांच्या संपर्कातल्या आलेल्यांचे आकडे हजारात असू शकतात. जानेवारीपासून 2 हजार विदेशी तब्लिगी भारतात दाखल झाले होते, अशी देखील माहिती आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाने मरकजमध्ये सामील लोकांची लिस्ट 21 मार्चलाच सर्व राज्यांना कळवली होती. 19 मार्चला जेव्हा तेलंगणामध्ये या कार्यक्रमात सहभागी झालेले 19 जण पॉझिटिव्ह आढळले होते त्याचवेळी केंद्राने राज्यांना कळवले होते. आज त्याला 10 दिवस पूर्ण होत आहेत. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”