व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! गेल्या २४ तासात जगभरात २ हजार ३०६ मृत्यू, जाणून घ्या कोणत्या देशात किती रुग्ण ?

वृत्तसंस्था | जगावरचे कोरोनाचे संकट हळू हळू वाढतानाच दिसत आहे. जगातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या आता २१ हजार २०० वर पोहोचलीआहे. धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनामुळे तब्बल २ हजार ३०६ मृत्यू झालेत. तर ४६ हजार नवीन कोरोना रुग्ण सापडलेत. ताज्या आकडेवारीनुसार स्पेनमध्ये मागील २४ तासांत ६५६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय. तर इटलीत ६०० हून अधिक दगावलेत. अमेरिकेतही एका दिवसात १६० जणांना कोरोनामुळे मृत्यू झालाय.

स्पेन मध्ये तर कोरोनाने हाहाकार माजवलाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत स्पेनने चीनलाही मागे टाकलंय. स्पेनमध्ये आत्तापर्यंत ३ हजार ६४७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर चीन मध्ये ३ हजार २८७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. इटलीतील बळींची संख्या साडेसात हजारांवर पोहोचलीय. जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीत झालेत. अमेरिकेतील एकुण मृतांचा आकडा हजाराच्या जवळ आहे तर ६६ हजार जण कोरोनाने बाधित आहेत. फ्रान्समध्ये एकुण १३३१ जणांचे मृत्यू झालेत. बेल्जियम, हाॅलंड, स्विझर्लंड, इंग्लंड या देशांत अनुक्रमे आत्तापर्यंत १७८, ३५६, १५३, ४६५ जणांचे कोरोनाने मृत्यू झालेत. इराणमधील मृतांचा आकडा २ हजार आहे तर एकुण रुग्णांची संख्या २७ हजार आहे.

पहा आकडेवारी –

इटली ७ हजार ५०० मृत्यू
स्पेन – ३ हजार ६४७ मृत्यू
चीन – ३ हजार २८७ मृत्यू
फ्रांस – १ हजार ३३१ मृत्यू
बेल्जीयम – १७८ मृत्यू
हॉलंड – ३५६ मृत्यू
स्विटसरलँड १५३
इंग्लंड – ४६५
भारत – ६००

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस

कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या

‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…

सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या