Sunday, April 2, 2023

दिलासादायक! पुढील ३ महिने EMI द्यावा लागणार नाही

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लागू केलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान कोणतीही सरकारी बँक पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाही. मंगळवारी १३ सरकारी बँकांनी याची घोषणा केली. या बँका ३१ मे २०२० पर्यंत कोणत्याही कर्जाची ईएमआय आकारणार नाहीत.

याआधी कोरोना व्हायरसचा देशातील अर्थकारणावर होणार परिणाम लक्षात घेत रिझर्व्ह बँकेने बँकांचे कर्ज स्वस्त व सुलभ करण्याच्या दृष्टीने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या या अनपेक्षित महत्वाच्या निर्णयामुळं बँकांना कर्जधारकांकडून कर्जाच्या मासिक हप्त्यांच्या (ईएमआय) वसुलीसाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. दरम्यान, १ मार्च २०२० च्या परिस्थितीनुसार सर्व प्रकारच्या कर्जाची वसुली तीन महिने स्थगित करण्यासंदर्भात बँकांना तीन महिन्यांची मुभा देण्यात आली असल्याचे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते.

- Advertisement -

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न

जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी