Tuesday, June 6, 2023

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे.

कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ टक्के नोकऱ्या जाऊ शकतात, असा अंदाज या सर्व्हेक्षणात वर्तवला आहे. तब्बल २०० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सीआयआयच्या सर्वेक्षणात ऑनलाइन पद्धतीनं भाग घेतला होता. ‘CII सीईओ स्नॅप पोल’ असं या नावाच्या सर्वेक्षणानुसार देशातील सर्वाधिक कंपन्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा थेट परिणाम येणाऱ्या काळात रोजगारावर होणार असून तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जाणार असल्याचा अंदाज सीआयआयच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.

वर्तमान तिमाहित आणि गेल्या तिमाहित बहुतांश कंपन्यांच्या उत्पन्नात १० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. देशांतर्गत कंपन्यांचं उत्पन्न आणि नफा या दोन्हीमध्ये होत असलेल्या घसरणीचा परिणाम देशाच्या जीडीपीवरही पडणार असल्याचं सीआयआयकडून सांगण्यात आलं. रोजगाराच्या आघाडीवर विविध क्षेत्रातील तब्बल ५२ टक्के नोकऱ्यांवर गडांतर येऊ शकतं. तर दुसरीकडे लॉकडाउनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ४७ टक्के कंपन्यांमध्ये १५ टक्क्यापेक्षा कमी नोकऱ्यांवर गडांतर येण्याची शक्यता आहे. तर ३२ टक्के कंपन्यांमध्ये १५ ते ३० टक्क्यांच्या दरम्यान रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता सर्व्हेक्षणादरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर