ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवला; महाराष्ट्रात पण वाढणार काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । देशभरात सध्या एकाच विषयावर चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लॉकडाउन लांबणार कि संपणार? करोनामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर विचार सुरू असतानाच ओडिशा सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे.

तेलगांनानंतर लॉकडाउन वाढवणार ओडिशा दुसरं राज्य ठरलं आहे. त्यामुळे देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही असाच निर्णय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी याची घोषणा केली ओडिशामध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन असणार आहे. विशेष म्हणजे १७ जूनपर्यंत ओडिशातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे एक मागणी केली आहे. ३० एप्रिलपर्यंत देशातील विमानसेवा, रेल्वे सेवा सुरू करू नये, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती करोनाच्या संसर्गामुळे गंभीर होत चालली आहे. येत्या १४ एप्रिलपर्यन्त लागू असलेल्या लॉकडाउन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारनं आधीच लॉकडाउन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाउनसंदर्भात वाढवण्यासंदर्भात अद्याप कोणतीही भाष्य करण्यात आलेलं नाही. मात्र, येत्या ११ तारखेला राज्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतरच लॉकडाउन वाढवण्याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.लॉकडाउन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारच्या विचाराधीन असतानाच ओडिशा सरकारनं मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

या महत्वाच्या बातम्याही वाचा –

Leave a Comment