पंतप्रधान मोदींनी केलं राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी पुन्हा एकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवला असल्याचा फायदा झाला असल्याचं सांगत नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. लॉकडाउनसाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांचा प्रभाव काही प्रमाणात दिसत असून त्याचा फायदा होत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत बोलताना नरेंद्र मोदींनी म्हटलं की, “सर्व मुख्यमंत्र्यांशी माझी वैयक्तिक स्तरावर चर्चा होत असते. पण एकत्रित संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे”. बैठकी दरम्यान ९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं म्हणणं मांडत राज्यातील परिस्थितीची पंतप्रधान मोदींना माहिती दिली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सहभागी झाले होते. त्यांनीही मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ज्या राज्यांमध्ये लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे तिथे योग्य ती काळजी घ्यावी असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. करोना व्हायरससोबतचं हे युद्ध दीर्घकाळ चालणारं असून धीर ठेवला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, १४ एप्रिल रोजी लॉकडाउनची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारनं त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली होती. लॉकडाउनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपत आहे. तर करोनाग्रस्त रुग्णांचा आकडाही वाढत आहे. दुसरीकडं आर्थिक संकटही डोकं वर काढायला लागलं असून, ३ मे नंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढणार का? याकडे देशवासियांचं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment