लॉकडाऊन साईडइफेक्ट: नवरा लुडो खेळताना खोटारडेपणा करतो म्हणून पत्नीची थेट पोलिसांत धाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंथा । कोरोना आणखी फैलावू नये म्हणून देशभरात लॉकडाऊन लागू आहे. अशा वेळी नागरिक आपआपल्या घरात राहायला मजबूर आहेत. अशा वेळी लॉकडाऊनच्या निम्मिताने घरातील मंडळी एक मोठा काळ आपल्या परिवारासोबत घालवत आहेत. बरेच जण हा काळ एन्जॉय करत आहेत. तर काही जण हा लॉकडाऊन कधी संपेल याची वाट पाहत आहेत. अशा वेळी घरात वेळ घालवण्यासाठी वेगवेगळे उद्योग करत आहेत. व्हिडिओ गेम वैगरेंना फाटा देत घरातील मंडळी एकत्र येऊन जुने खेळ खेळात आहेत. हे खेळ खेळताना थट्टा-मस्करीत भांडण होणं हा या खेळांचा गमतीचा आहे. पण हे भांडण थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत असेल तर.. हो अशीच एक बातमी उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादमधील मेरापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत समोर आली आहे. येथील एका पत्नीने थेट पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. लॉकडाउनच्या काळात घरामध्ये वेळ घालवण्यासाठी लुडो खेळताना पतीने खोटारडेपणा केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहचले.

मिळालेल्या माहितीनुसार मेरापूर पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका शेतकऱ्याचे पाच महिन्यापूर्वीच लग्न झाले. लॉकडाउनचा कालावधी सुरु असल्याने शेतामध्ये काही विशेष काम नसल्याने सदर शेतकरी मागील काही दिवसांपासून घरीच आहे. घरी असताना वेळ घालवण्यासाठी हा शेतकरी आपल्या बायकोसोबत लुडो खेळत असताना अचानक त्याच्या बायकोने आपल्या नवऱ्यावर खोटारडेपणा करत असल्याचा आरोप लावला. दोघांमधील वाद एवढा वाढला की हे प्रकरण अगदी पोलिसांपर्यंत गेले, असं पत्रिका डॉटकॉमने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

दोघांमध्ये वाद सुरु असतानाच बायकोने ११२ क्रमांकावर फोन करुन पोलिसांकडे या प्रकरणात तक्रार केली. पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी म्हणजेच या दोघांच्या घरी पोहचले. दोघांनाही पोलिसांच्या गाडीमधून पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलं. दोघांचीही चौकशी केल्यानंतर नवऱ्यानं खोटारडेपणा केल्याचा आरोप त्याच्या बायोकोने लुडो खेळताना झालेल्या भांडणामधून केल्याचे स्पष्ट झालं. ‘माझा नवरा लुडो खेळताना खोटारडेपणा करतो,’ असं या महिलेचं म्हणणं होतं. पोलिसांनी या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवून न घेता दोघांनाही समज दिली आणि घरी पाठवले. “दोघांमध्ये लुडो खेळण्यावरुन वाद झाला होता. दोघांनाही समजूत देऊन घरी पाठवण्यात आलं आहे. समजूत घातल्यानंतर दोघांनाही एकत्रच राहू असं आश्वसन दिलं आहे,” अशी माहिती पोलीस ठाण्याचे प्रमुख आर. के. रावत यांनी या प्रकरणी बोलताना दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment