शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे तब्बल 4 लाख कोटी बुडाले; ‘हे’ आहे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे देशांतर्गत बाजार पुरता कोलडमला आहे. मंगळवारी निर्देशांक 1237 अंकांनी घसरून 30,410 च्या पातळीवर आला. तर निफ्टीमध्ये 350.75 घसरण झाली असून, तोसुद्धा 8911च्या पातळीवर आला. शेअर बाजारात झालेल्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांना 4 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सोमवारी अमेरिकेच्या वायदा बाजारात कच्च्या तेलाची किंमत शून्य म्हणजेच -37.63 डॉलर/ बॅरलच्या खाली गेली होती.

इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा कच्च्या तेलाची किंमत एवढ्या नीचांकी पातळीवर गेली. फक्त तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलांच्या किमतीमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कच्च्या तेलांच्या किमतीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर घट होण्याचं एक कारण म्हणजे लॉकडाऊन. कोरोना व्हायरसमुळे जगभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. तसेच हवाई वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. सौदी अरब आणि रूस यांच्यामधीस प्राइज वॉरमुळेही मागणीत घट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जगभरात तेलाचं उत्पादन वाढत आहे. परंतु, मागणीत घट झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. जगभरातील औद्यागिकीकरण बंद आहे. ज्याचा प्रभाव कच्च्या तेलाच्या किमतींवर पडला आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याच्या परिस्थितीमुळे जगातील कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरी येत्या काही महिन्यांत बाजार उसळी घेईल.

गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले

शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे 4 लाख कोटी बुडाले. सोमवारी मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध एकूण कंपन्यांचं भाग भांडवल 1,23,72,581.25 कोटी रुपये होते, जे आज 3,97,028 कोटी रुपयांनी घसरून 1,19,75,553.68 कोटी रुपयांवर आलं आहे. या बाजारातील घसरणीमुळे मिड आणि स्मॉल कॅप समभागांची जोरदार विक्रीही झाल्याचं दिसून आलं. बीएसईचा मिड कॅप निर्देशांक 3 टक्क्यांच्या आसपास आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 3.11 टक्क्यांनी घसरून व्यापार करत होता.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment