भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हेटेरो लॅब्स या फार्मास्युटिकल कंपनीने भारतात ‘फॅवीपिराविर’ या ब्रँड नावाने कोविड​​-19 ची सौम्य तसंच मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारांमध्ये वापरल्या जाणार्‍या जेनेरिक ओरल अँटीवायरल ड्रग फॅव्हिपाविर लॉन्च केले आहे. कंपनीने एका टॅब्लेटची किंमत 59 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, फॅवीपिराविरच्या निर्मितीचे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला (डीसीजीआय) मार्केटींग हक्क मिळाले आहेत. हे औषध मूळत: फूजी फार्मा या जपानी कंपनीने विकसित केलेले होते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये फॅवीपिराविरने चांगले रिझल्ट्स दिले आहेत. हे औषध कमी आणि मध्यम पातळीवर संसर्ग असणाऱ्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सीएसआयआरने देशात उपलब्ध रसायनांचा वापर करून या औषधासाठी एक अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएंट (एपीआय) तयार केला आहे. त्यानंतर त्यांनी हे औषध निर्मितीसाठी सिप्लाला दिले.

सिप्ला पुढील महिन्यात कोरोनावरील औषध बाजारपेठेत दाखल करणार
भारतातून सिप्ला ही आणखी एक फार्मा कंपनी ऑगस्टमध्ये फॅवीपिराविर हे औषध लॉन्च करणार आहे. याचा उपयोग कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार, सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR-Council of Scientific & Industrial Research) यांनी कमी किंमतीत हे औषध तयार केले आहे. सिप्लाला हे औषध लॉन्च करण्यासाठी डीसीजीआय कडून परवानगी मिळाली आहे. सिप्ला भारतात हे औषध ‘सिप्लान्झा’ या ब्रँड नावाने लॉन्च करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते बाजारात येईल. या औषधाच्या एका टॅब्लेटची किंमत 68 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

एका वृत्तानुसार, सिप्लाने त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मध्ये हे औषध तयार करण्याच्या प्रक्रियेस गती दिली आहे. डीसीजीआयने देशातील आपत्कालीन परिस्थितीत फॅवीपिराविरच्या वापरला परवानगी दिली आहे, यामुळे सिप्ला लवकरच हे औषध कोरोना रूग्णांच्या उपचारात वापरण्यासाठी आणणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठीआम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment