चिंताजनक! भारत कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये इटलीच्याही पुढे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. या विषाणूने आपले हातपाय संपूर्ण जगात परसरवले आहेत. अनेक देश कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयन्त करत आहेत. पण कोरोनाचा वाढता संसर्ग त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत नाही आहे. जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी ही संख्या आता कोरोना साथीनं बेजार झालेल्या देशांच्या तुलनेत आणखी वाढण्याच्या दिशेनं जात आहे. कारण कोरोनाच्या सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेमध्ये भारतानं आता इटलीलाही मागे टाकलं आहे. भारतात सध्या ६३ हजार १७० पेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहे. कोरोना व्हायरसशी निगडीत रिअल टाईम डेटा मिळवणाऱ्या ‘वर्ल्डोमिटर्स’ या बेवसाईटच्या डेटावरून ही माहिती समोर आली आहे.

इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ३२ हजार ३३० जणांना मृत्यू झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या २ लाख २५ हजारांपेक्षाही अधिक आहे. तर भारतात आतापर्यंत १ लाख ११ हजारांपेक्षा अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. या आठवड्याच्या सुरूवातीपासूनच देशात दररोज ५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. चीनननंतर सर्वाधित कोरोना व्हायरसचा प्रभाव हा इटलीवर पडला होता.

कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसच्या दृष्टीनं पाहिलं तर अमेरिका, रशिया, ब्राझिल आणि फ्रान्स या देशांमध्येच भारतापेक्षा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. अमेरिकेत सध्या ११ लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर रशियात २ लाख २० हजार, ब्राझिलमध्ये १ लाख ५७ हजार आणि फ्रान्समध्ये ९० हजार अ‍ॅक्टिव्ह केसेस असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment