आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली.

ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, आरोग्य मंत्रालयाच्या इतर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की,’ सध्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणावर micro लॉकडाउन करण्याचा राज्यांकडे अधिकार आहे. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एखाद्या राज्यातील एखाद्या विशिष्ट भागात, खेड्यात किंवा शहरात जर या संसर्गाची वेगाने वाढ झाली तर ते राज्य सरकार त्या भागात काही दिवसांसाठी लॉकडाउन लादू शकतात. मध्यप्रदेशने प्रत्येक रविवारी तर उत्तर प्रदेशात शनिवार आणि रविवारच्या धोरणावर काम सुरू केले आहे.

महाराष्ट्रातही पुणे येथे सध्या लॉकडाऊन सुरू झाले आहे. त्याचे नाव micro लॉकडाउन असे आहे. मात्र, या लॉकडाउनच्या दुष्परिणामांविषयी आणि यापूर्वी झालेल्या चुकांमधून बोध घेणे देखील आवश्यक आहे. कोरोना विषाणूसाठी 24 मार्च रोजी देशात जनता कर्फ्यू आणि आणि त्याच रात्री दुपारी 12 ते 31 मे या कालावधीत लॉकडाऊनचे वेगवेगळे टप्पे पाहिल्यानंतर 1 जूनपासून देश अनलॉक केलेल्या स्थितीत आहे.

मास्क आणि सोशल डिस्टंसिंगकडे दुर्लक्ष करून झालेल्या हजारो स्थलांतरित मजुरांच्या स्थलांतरणामुळे देशातील बर्‍याच भागात हा विषाणूचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता धोरणात्मक पद्धतीने राज्यांचे निरीक्षण करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना असे सांगितले जात आहे की, जर कोणत्याही गल्लीत, मोहल्ल्यात किंवा कॉलनीमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत गेली तर सर्वप्रथम मिनी मायक्रो म्हणजेच कंटेनमेंट झोनवरील सक्रिय काम फार महत्वाचे आहे. जर हे केले नाही तर संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढ वेगाने सुरू होईल. जर ही परिस्थिती बदलली नाही तरीही काही तास किंवा दिवसांचे मायक्रो-लॉकडाउन एका विशिष्ट श्रेणीत लागू केले जाऊ शकते.

दिल्लीमध्ये लॉकडाउनची आवश्यकता नाही
आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्राप्रमाणेच काही दिवस किंवा आठवड्याच्या शेवटी दिल्लीमध्ये लॉकडाउनची गरज नाही. कारण गेल्या 20 ते 25 दिवसांत येथील परिस्थिती सुधारत आहे. जर तपासणी वेगाने वाढली असेल तर संसर्ग वाढीचा दरही लक्षणीयरित्या घटला आहे. अशा परिस्थितीत सध्या कंटेनमेंट झोनवरच लक्ष देण्याचा सल्ला राज्याला देण्यात आलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment