लंडन । कोरोना विषाणूनं संपूर्ण जगात नुसता हैदोस घातला आहे. हैदोस पण असा कि, सायलेंट किलर सारखा. थो थोडीशी चूक आणि काही अवधीत शांततेत अनेक जीव मरणाच्या हवाली. या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला काबूत करण्यासाठी अनेक खबरादारीचे उपाय संशोधकांनी सुचवले. त्याचा अवलंब सुद्धा लोक करताना दिसत आहेत. मात्र, कोरोना साथीचा प्रकोप जसं जसा आणखी वाढत आहे त्याच्याविषयी अनेक आश्चर्यकारक संशोधन रोज समोर येत आहे. असेच एक संशोधन सोशल डिस्टेंसिंगबाबत समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी लोक सोशल डिस्टेंसिंगचे कटाक्षानं पालन करत आहेत मात्र, त्यातही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे असं एका संशोधन अभ्यासातून समोर आलं आहे.
या अभ्यासानुसार, हवेत एका हलक्या खोकल्यामुळे येणारी लाळेतील कण १८ फूटांपर्यंत पसरू शकतात. सायप्रस येथील निकोसिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रतितास चार किमी वेगाने वाहणाऱ्या हवेतून खोकल्यानंतर तोंडावाटे येणाऱ्या लाळेतील कण ५ सेकंदात १८ फूट दूरपर्यंत फैलावू शकतात. त्यामुळं सोशल डिस्टेंसिंग पाळताना ६ फुट अंतर ठेवावे असं सुचवलं जात असताना सदर अभ्यासानुसार ६ फूटांच्या सोशल डिस्टेंसिंगवरही करोनाची बाधा होण्याचा धोका कायम असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे.
या संशोधनातील सह-संशोधक दिमित्री द्रिकाकिस यांनी सांगितले की, खोकल्यातून येणाऱ्या लाळेमुळे वयस्कर आणि लहान मुलांना धोका संभवू शकतो. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लाळेच्या सुक्ष्म कणांमुळे लहान उंचीचे वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना धोका संभवतो. हे संशोधन जर्नल फिजिक्स ऑफ फ्लुइडमध्ये प्रकाशित झाले आहे.दरम्यान, जगभरातील शास्त्रज्ञ करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये करोनाच्या लसीवर संशोधन सुरू असताना करोनाला अटकाव करणारे औषध विकसित केले असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनमधील प्रतिष्ठित पेकिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. या औषधाने करोनाबाधिताच्या प्रकृती फक्त सुधारणा होणार नसून काही वेळेसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रयोग करोनाबाधित उंदरांवर यशस्वी झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”