स्पेनमध्ये तब्ब्ल दोन महिन्यानंतर शंभरहून कमी मृत्यूंची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था तसेच आरोग्य यंत्रणाही त्यामुळे ढासळल्या आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, चीन हे कोरोनाने सर्वाधिक बाधित देश आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फटका बसलेल्या स्पेनमधून तब्ब्ल दोन महिन्यानंतर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. या बातमीमध्ये स्पेनमध्ये मृतांच्या संख्येत घट होत असल्याची माहिती देण्यात आली असून गेल्या २४ तासांत फक्त ८७ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्पेनमध्ये मागील दोन महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसांत शंभराहून कमी लोकांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये करोनाने अक्षरशः थैमान घातले होते. आशियामधील चीननंतर इटली आणि स्पेन या युरोपीयन देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरू होता. स्पेन आणि इटली हे कोरोनाच्या संसर्गाचे मुख्य केंद्र झाले होते. आता, स्पेनमध्ये कोरोनाचा जोर ओसरत असल्याचे चित्र दिसत आहे. स्पेनमध्ये काल शनिवारी फक्त १०४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर, शुक्रवारी १३८ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्पेनमध्ये आतापर्यन्त सुमारे दोन लाख ७७ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे तसेच २७ हजार ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक लाख ९५ हजार जणांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. स्पेनमध्ये कोरोनाच्या थैमानामुळे सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या निर्बंधात थोडी शिथिलता देण्यात आलेली आहे.

दरम्यान, रशियात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी तेथे कोरोनाची बाधा झालेले सुमारे ९२०० नवीन रुग्ण आढळून आलेत. रशियात आतापर्यंत दोन लाख ८१ हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे १४ मार्च रोजी स्पेनमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment