Wednesday, February 1, 2023

धसका करोनाचा! कोल्हापूरात केवळ शिंकल्यामुळं एकाला बेदम मारहाण

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
एकीकडे जीवघेण्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनापासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे करोनाची दहशत लोकांमध्ये पसरली असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरात करोनाच्या धसक्यातून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

काल शहरातील गुजरी गल्लीत बाईक वरुन जाणाऱ्या दोघांमध्ये केवळ अंगावर शिंकल्याच्या कारणावरुन वाद झाला. हा वाद केवळ शाब्दिक न राहता याच रूपांतर थेट हाणामारीत झाल. एका दुचाकीवरील महिला व पुरुषाने दुसऱ्या दुचाकीवरील पुरुषाची शिंकलाच का? असं विचारात चांगली धुलाई केली असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये करोनामुळं धास्ती पसरली असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.