पुलवामा शहीदाची वीरपत्नी कोरोनाच्या लढाईत पोलिसांच्या मदतीला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशावर कोरोनाचे अभूतपूर्व असं संकट आलं आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलं आहे. अशा वेळी संपूर्ण देश या कोरोनाशी लढत आहे. या लढाईत सर्वात आघाडीवर असलेले कोरोना योद्धे आपला जीव धोक्यात घालून या संकटाला रोखण्याचा प्रयन्त करत आहेत. यामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा यंत्रणेतील व्यक्ती, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या योद्ध्यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. असं असतानाच अनेकजण या कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले मेजर विभूति ढौंडियाल यांची पत्नी निकिता कौल यांनाही कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आल्या आहेत. निकिता यांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी १ हजार पीपीई (पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट्स) कीट्स दिले आहेत. निकिता यांनी हरीयाणा पोलिसांना ही मदत केली आहे. पीपीई कीट्समध्ये मास्क, ग्लोव्हज आणि इतर प्रतिबंधात्मक साहित्याचा समावेश होतो. या कीट्सचा फायदा हरयाणा पोलिसांना होणार होणार आहे.

यासंदर्भात फरिदाबाद पोलिसांनी ट्विटही केले आहे. पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये, “पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या मेजर विभूती ढौंडियाल यांच्या पत्नी निकिता कौल यांनी फरिदाबाद पोलिसांना एक हजार पीपीई कीट्स दिले आहेत. आम्ही यासाठी त्यांचे आभार मानतो,” असं म्हटलं आहे.

याचबरोबर हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही ट्विटवरुन कौल यांच्या योगदानाचे कौतुक केलं आहे. “देशासाठी प्राण देणाऱ्या मेजर विभूती ढौंडियाल यांची पत्नी निकिता कौल यांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्या हरयाणा पोलिसांच्या कर्मचाऱ्यांना एक हजार पीपीई कीट्स (मास्क, ग्लोव्हज, गॉगल) दिले आहेत. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. तुमचे योगदान बहुमूल्य आहे,” असं खट्टर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment