सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
चिली या देशातून प्रवास करुन आलेल्या सातारा जिल्ह्यातील ३४ वर्षीय युवकाला जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ चा अनुमानित रुग्ण म्हणून आज दाखल करण्यात आले आहे. त्याला सर्दी असल्याने सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासणीनंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.
त्याच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तथापी कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी तसेच वेळोवेळी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या आदेशाचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
दरम्यान राज्यात शनिवारी कोरोनाचे नवे ११ रुग्ण सापडले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा आता २९९ वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. सातारा जिल्ह्यात अजून कोरोनाचा एकही पोझिटीव्ह रुग्ण सापडले नाही.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ! आकडा ३१४ वर
बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने दिली थेट कोरोनाला धमकी, केला हा बोल्ड फोटो शेयर
लढा कोरोनाशी : कोरोनाची भीती कमी करायला हे वाचलंच पाहिजे बरं का..!!
धक्कादायक! ४ करोनाग्रस्त रुग्णांनी केला मुंबई-जबलपूर ट्रेन प्रवास
राज्यातील रुग्णांची संख्या ६३ वर;आज वाढलेल्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेले ८